माझ्या जीवाला धोका, लोकं मला मारून टाकतील; तेज प्रताप यादव यांचा दावा

बिहारमधील जनशक्ती जनता दल प्रमुख व लालू प्रसाद यादव यांचे ज्येष्ठ पुत्र तेज प्रताप यादव यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. बिहार निवडणूकीच्या दुसऱ्या टप्प्याच्या आधी त्यांना Y+ सुरक्षा देण्याचा निर्णय गृहमंत्रालयाने घेतला आहे.

तेज प्रताप यादव यांनी काही दिवसांपूर्वी गृहमंत्रालयाशी संपर्क साधत त्यांच्या जीवाला धोका असल्याचे सांगितले होते. त्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे तेज प्रताप यांना y+ सुरक्षा देण्यात आली असून त्यांच्या भोवती 11 सीआरपीएफ जवानांचं कडं असणार आहे.

याविषयी प्रसारमाध्यमांशी बोलताना तेज प्रताप यांनी सांगितले की, माझे खूप शत्रू आहेत. त्यामुळे माझ्या जीवाला धोका आहे. काही लोकं माझ्या जीवावर उठले आहेत व ते कधीही माझ्यावर हल्ला करू शकतात त्यामुळे माझी सुरक्षा वाढवण्यात आली आहे”