
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 16 जानेवारी हा स्टार्ट- अप दिवस म्हणून साजरा केला जाणार असल्याची घोषणा केली. देशातल्या स्टार्ट-अप उद्योजकांशी संवाद साधताना पंतप्रधान बोलत होते. ‘स्टार्ट-अप’ ही संकल्पना देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्यासाठी हा दिवस साजरा करण्यात येणार असल्याचे पंतप्रधान म्हणाले.

























































