
नव्वदीच्या वयात अधिकतर महिला नीट चालू शकत नाहीत. जपानची ताकिशिमा मिका ही महिला मात्र वयाच्या 90 व्या वर्षी चक्क जिममध्ये अनेकांना फिटनेसचे धडे देते. एखाद्या वीस वर्षांच्या मुलीसारखा या आजीबाईंचा फिटनेस आहे. जपानमधील सर्वाृत वयोवृद्ध फिटनेस इन्स्ट्रक्टर म्हणून त्या ओळखल्या जातात. ताकिशिमा मिका या सुरुवातीपासून इतक्या फिट नव्हत्या. वयाच्या 60 व्या वर्षानंतर त्यांनी वजन कमी करायचे ठरवले. पाच वर्षांमध्ये ताकिशिमा यांनी 15 किलो वजन कमी केले.





























































