
जपानने हिंदुस्थानविरुद्धच्या विशेष टी-20 सामन्यासाठी आपला संघ जाहीर केला आहे. या सामन्यात केवळ आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी झालेले खेळाडूच खेळतील. हा टी-20 सामना 22 सप्टेंबरला जपानमध्ये खेळला जाईल. या सामन्याचे थेट प्रक्षेपण करण्याचे हक्क ‘फॅनकोड’कडे आहेत. पण दूरचित्रवाणी प्रसारणाचा करार अद्याप निश्चित झालेला नाही. सामना हिंदुस्थानच्या वेळेनुसार सकाळी 9ः30 वाजता सुरू होईल.
जपानचा संघः पेंडेल काडोवाकी फ्लेमिंग (कर्णधार), चार्ली हारा हिंझे, बेंजामिन इटो-डेव्हिस, अॅलास्टेयर काडोवाकी फ्लेमिंग, कोहेई पुबोटा, जेक पुसुडा-नेर्न, वातारू मियाउची (यष्टिरक्षक), रिओ सापुरानो-थॉमस, अॅलेक्स शिराई-पात्झुकिटर, सुगाया मॅकक्लॅन (यष्टिरक्षक), त्सुयोशी ताकाडा, इब्राहिम ताकाहाशी, माकोटो तानियामा, लॅकलॅन यामामोटो-लेक.
हिंदुस्थानचा संघ ः श्रेयस अय्यर (कर्णधार), वैभव सूर्यवंशी, तिलक वर्मा, अभिषेक शर्मा, शिवम दुबे, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, संजू सॅमसन, ईशान किशन, वरुण चक्रवर्ती, रवी बिष्णोई, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमरा, हर्षित राणा.



























































