जावेद अख्तर मानहानी प्रकरणात कंगना अडचणीत, न्यायालयाने जारी केले वॉरंट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गीतकार-लेखक जावेद अख्तर मानहानी प्रकरणात अभिनेत्री कंगना रनौतविरोधात न्यायालयाकडून जामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले आहे. खोटे आरोप करत जावेद अख्तर यांची प्रतिमा मलीन करण्याचा आरोप कंगनावर ठेवण्यात आला आहे.

1 फेब्रुवारी 2021 झालेल्या सुनावणीत न्यायालयाने कंगनाला समन्स बजावत पुढील सुनावणीला (1 मार्च) हजर राहण्याचे आदेश दिले होते. जावेद अख्तर हे याप्रकरणाच्या सुनावणीसाठी आपल्या वकिलासोबत न्यायालयात हजर झाले होते. मात्र कंगना या सुनावणीसाठी न्यालयानात आली नाही. यावरच कडक पावले उचलत महानगरदंडाधिकाऱ्यांनी कंगनाविरोधात जामीनात्र वॉरंट जारी केले आहे.

काय आहे प्रकरण?

सुशांतसिंह आत्महत्याप्रकरणात कंगनाने रिपब्लिक टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत जावेद यांचा उल्लेख केला होता. यामध्ये तिने एका बॉलीवूड सुपरस्टारसोबतच्या वादावरून जावेद यांच्याबाबत वादग्रस्त विधाने केली. मात्र या प्रकरणात माझा काहीही संबंध नसताना कंगनाने माझ्यावर धादांत खोटे आरोप केले आहेत, असे म्हणत जावेद अख्तर यांनी यांनी कंगनाविरोधात मानहानीचा गुन्हा दाखल केला होता.