वाहनाच्या धडकेत जवानाचा मृत्यू

पुणे नगर राज्य मार्गावर मलठण फाटा येथे अज्ञात वाहनाने ठोकर दिल्याने सैन्यातील सैनिकाचा जागीच मुत्यु झाला. शिरिष नंदकिशोर पाटील (वय 37) रा.मलठण फाटा शिक्रापूर मुळ गाव भिंगार जि.नगर असे मुत्युमुखी पडलेल्या सैनिकाचे नाव आहे. ते सैन्यदलात कार्यरत होते. नुकतीच त्यांची राजस्थान येथून पुणे येथे बदली झाली होती.

याबाबत शिक्रापूर पोलिसांत अज्ञात वाहनाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे .पाटील हे रात्रीच्या वेळी रस्ता ओलांडत असताना पुण्याहुन नगरकडे जात असलेल्या भरघाव वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली त्यात पाटील हे जागीच मुत्युमुखी पडले. याबाबत संतोष प्रभु गोरडे यांनी शिक्रापूर पोलिस स्टेशन मध्ये फिर्याद दिली आहे. मलठण फाटा परिसरात अनेकदा छोटे मोठे अपघात झाले आहेत. हे अपघात केवळ गतीरोधक नसल्याने झाले आहेत. मलठण फाटा वर्दळीचा चौक आहे.येथे गतीरोधक बसवण्याची वारंवार मागणी नागरिक करत असुनही प्रशासन दुर्लक्ष करत आहे. या ठिकाणी ताबोडतोब गतीरोधक बसविण्यात यावेत अशी मागणी नागरिकांतून आहे.

आपली प्रतिक्रिया द्या