नक्षलवादी हल्लात पाटोद्याचा भुमिपुत्र जवान शेख तोसीफ शहिद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । पाटोदा

महाराष्ट्र दिनाच्या दिवशीच गडचिरोलीतील कुरखेडा तालुक्यात नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या भूसुरूंग स्फोटात 15 जवान शहीद झाले. या स्फोटात पाटोदा शहरातील जवान तोसिफ आरिफ शेख हे या हल्ल्यात शहीद झाले आहेत. या वृत्तानंतर शहरावर शोककळा पसरली आहे.

सामान्य कुंटुबात जन्मलेले तोसीफ हे मनमिळावू स्वभावाचे होते.त्यांच्या पश्चात पत्नी, वडील, आई, दोन भाऊ ,दोन मुले आहेत. त्यांचा एक मुलगा पाच वर्षांचा तर लहान मुलगा एक वर्षांचा आहे. तोसीफ च्या जाण्याने परिवारसह संपूर्ण पाटोदा नगरीवर दुखाचा डोंगर कोसळला आहे.