सेवेची संधी द्या, विकासाची जबाबदारी माझी- जयदत्त क्षीरसागर

493
jaydutt-kshirsagar

आहेर धानोरा आणि वरवटी हे दोन्ही गावे शिवसेनेवर निस्सीम प्रेम करणारे आहेत. या गावात शिवसेनेशिवाय कोणत्याही पक्षाला थारा मिळत नाही. दोन्ही गावात सभागृहाची मागणी होती ती पूर्ण झाली आहे. आता सेवेची संधी द्या पुढच्या विकासाची जबाबदारी मी घेतो अशी ग्वाही राज्याचे रोहियोमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी दिली.

आहेर धानोरा येथील हनुमान मंदीराचे भव्य सभागृह आणि वरवटी येथील विठ्ठल मंदिर भव्य सभागृहाचा लोकार्पण सोहळा ना.जयदत्त क्षीरसागर यांच्या हस्ते मंगळवारी पार पडला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे, सचिन मुळूक, माजी जिल्हाप्रमुख बाळासाहेब पिंगळे, विलास बडगे, दिनकर कदम, वैजिनाथ तांदळे, बाळासाहेब अंबुरे, सखाराम मस्के, नितीन धांडे, विनोद मुळूक, गोरख शिंगण, सागर बहीर, सुशिल पिंगळे, अशिष मस्के, अमोल बागलाने, रतन गुजर, त्रिबंक दिवे, गणेशमस्के आदींची प्रमुख उपस्थिती होती.

आपली प्रतिक्रिया द्या