सतीश आळेकर यांना जीवन गौरव पुरस्कार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ज्येष्ठ नाटककार सतीश आळेकर यांच्यासाठी आजचा दिवस विशेष ठरला. राज्य शासनाचे 2020-21चे नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवन गौरव आणि विष्णुदास भावे गौरव हे दोन पुरस्कार आज जाहीर झाले.

ज्येष्ठ नाटककार दत्ता भगत यांना 2021-22 या वर्षाचा जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला असून संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार दीप्ती भोगले आणि सुधीर ठाकूर यांना जाहीर करण्यात आला आहे. या दोन्ही पुरस्कारांचे स्वरूप 5 लाख रुपये रोख, मानचिन्ह आणि मानपत्र असे आहे. सतीश आळेकर यांना रंगभूमी दिनी 5 नोव्हेंबर रोजी भावे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.