
प्रथितयश चित्रकार एम. नारायण यांच्या नवनिर्मित चित्रांचे सोलो प्रदर्शन जहांगीर कलादालनात आयोजित करण्यात आले आहे. हे प्रदर्शन 14 फेब्रुवारीदरम्यान दररोज सकाळी 11 ते सायंकाळी 7 या वेळेत विनामूल्य बघता येईल.
एम. नारायण मूळचे कर्नाटकचे असून देशविदेशात त्यांच्या चित्रांचे प्रदर्शन झालेले आहे. रचनात्मक, कलात्मक चित्रकार अशी त्यांची ओळख आहे. ते सध्या पुण्यामध्ये राहतात. ‘द पोलो सीरिज’ प्रदर्शनात अश्व, त्यांची ताकद, वेगवान शर्यती, पोलो खेळ व त्यातील चुरस व आक्रमकता आणि स्पर्धात्मक आव्हाने तसेच शर्यत जिंकण्याची व त्यात यशस्वी होण्याची जिद्द व मानसिकता यांचे यथार्थ दर्शन घडते. एम. नारायण यांची पोलो पेंटिंग्स रसिकांना अक्षरशः थेट पोलो मॅचमध्ये घेऊन जातात. प्रत्येक चित्रातून खेळाची ऊर्जा आणि वेग प्रतित होते. रंगांचा कलात्मक वापर करून तंत्रशुद्ध शैलीत बनवलेली त्यांची चित्रे खरोखर लक्षवेधी व मनमोहक आहेत.



























































