हॉलिवूड अभिनेत्रीची ‘ती’ पोस्ट पाहण्यासाठी लोकांच्या उड्या, अकाऊंट क्रॅश

1486

क्रिकेटपासून ते कबड्डीपर्यंत आणि बॉलिवूडपासून ते हॉलिवूडपर्यंत चाहत्यांपर्यंत पोहोण्यासाठी खेळाडू, अभिनेते, अभिनेत्री सोशल मीडियावर सक्रिय असतात. यामधून त्यांना चांगला पैसा आणि प्रसिद्धीही मिळते. नुकतेच हॉलिवूड स्टार जेनिफर एनिस्टन हिचेही ‘इन्स्टाग्राम’ या सोशल माध्यमावर आगमन झाले. यामुळे ती अचानक चर्चेत आली आहे. ‘इन्स्टाग्राम’वर तिची ओपनिंग खतरनाक झाली आहे. तिची पहिलीच पोस्ट प्रचंड व्हायरल झाली असून याची ‘गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नोंद झाली आहे.

‘फ्रेंड्स’ या टीव्ही मालिकेद्वारे रातोरात स्टार झालेली हॉलिवूड अभिनेत्री जेनिफर एनिस्टन हिने नुकतेच ‘इन्स्टाग्राम’ अकाऊंट सुरू केले आहे. यानंतर तिने पहिल्या पोस्टमध्ये एक फोटो शेअर केला आहे. यात लिजा कुद्रो, कॉ्टनी कॉक्स, मॅट लेब्लांके, मॅथ्यू पेरी आणि डेव्हीड स्किव्मर हे स्टार दिसत आहे. जेनिफरची ही पोस्ट वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झाली आणि फक्त 5 ता 16 मिनिटांमध्ये तिने एक मिलियन अर्थात 10 लाख फॉलोअर्सचा टप्पा गाठला. यासह तिने आपल्या नावाची ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद केली. याआधी हा विक्रम ससेक्सचा प्रिन्स हॅरी आणि त्याची पत्नी मेगन मार्केल यांच्या नावावर जमा होता. दोघांनीही इन्स्टाग्रामवर 5 तास 45 मिनिटात 1 मिलियन फॉलोर्सचा टप्पा गाठला होता. आता हा विक्रम जेनिफरच्या नावावर जमा झाला आहे.


View this post on Instagram

And now we’re Instagram FRIENDS too. HI INSTAGRAM

A post shared by Jennifer Aniston (@jenniferaniston) on

दरम्यान, सर्वात कमी काळात सर्वाधिक फॉलोअर्स मिळवणाऱ्या जेनिफरचे ‘इन्स्टाग्राम’ अकाऊंट काही काळासाठी क्रॅशही झाले होते. कारण एकाच वेळा हजारो लोक तिच्या ‘इन्स्टाग्राम’ अकाऊंटवर पोस्ट पाहण्यासाठी उड्या घेत होते. यानंतर तिने आणि एक पोस्ट शेअर केली. यात तिने ‘दि मॉर्निंग शो’मधील एक सीन शेअर केला आहे. या सीनमध्ये ती रागाच्या भरात फोन फेकून देताना दिसतेय.


View this post on Instagram

I swear I didn’t mean to break it… Thank you guys for the kind, glitchy welcome ❤️

A post shared by Jennifer Aniston (@jenniferaniston) on

आपली प्रतिक्रिया द्या