
गेल्या तीन वर्षांपासून बंद अवस्थेत असलेली जेट एअरवेजची सेवा लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव कपूर यांनी याबाबतचे संकेत दिले असून जेट एअरवेज चालू वर्षाच्या दुसऱया तिमाहीत भरारी घेईल असे त्यांनी म्हटले आहे.
जेट एअरवेजला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी गुंतवणूकदारांच्या समूहाने 2.0 हा कृती आराखडा तयार केला आहे. या समूहाचे नेतृत्व कालरॉक कॅपिटल आणि उद्योजक मुरारी लाल जालान यांच्याकडून करण्यात येत आहे. या समूहाला राष्ट्रीय कंपनी कायदा लवादाने 2021 मध्ये जेट एअरवेजचा प्रस्ताव मंजूर केला आहे.


























































