जेठालाल ट्रेडिंगमध्ये! वाढदिवसाला चाहत्यांनी मीम्समधून दिल्या अनोख्या शुभेच्छा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चाहते नेहमीच सोशल मीडियावर आपल्या लाडक्या कलाकाराचा वाढदिवस जोरात साजरा करताना दिसतात. ट्विटरवर असाच एक हॅशटॅग ट्रेंडिंगला आला. हा हॅशटॅग म्हणजे #jethalal… ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या लोकप्रिय मालिकेतील जेठालाल हे महत्त्वाचे पात्र साकारणारे अभिनेते दिलीप जोशी यांच्या वाढदिवशी हा हॅशटॅग ट्रेंडिंगमध्ये होता.  या हॅशटॅगवर जेठालालच्या चाहत्यांनी त्यांना शुभेच्छा देतानाच मीम्सचा वर्षाव केला.

 मालिकेत जेठालाल हे पात्र साकारणारे दिलीप जोशी यांचे लाखो चाहते आहेत. दीर्घकाळ सुरू असलेली ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ ही मालिका अनेकांची आवडती आहे. ही मालिका बघतच आपण लहानाचे मोठे झालो, अशा भावना चाहत्यांनी व्यक्त केल्या. तसेच मालिकेचे ‘रिपीट’ भागदेखील न चुकता बघतो, असे सांगणारे चाहतेही जेठालाल हॅशटॅगवर दिसले. तसेच केवळ आणि केवळ जेठालालच्या विनोदासाठीच ही मालिका बघतो, जेठालाल म्हणजे मालिकेचा आत्मा आहे, असं सांगत अनेक मीम्स व्हायरल झाले. अनेक चाहत्यांनी दिलीप जोशी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतानाच दररोज न चुकता हास्याचा डोस देण्याबद्दल आभारही व्यक्त केले.