जेटच्या संचालकांपैकी आणखी एकाचा राजीनामा

jet-airways

सामना ऑनलाईन । मुंबई

जेट एअरलाईन्स संचालक मंडळातील इत्तिहाद एअरलाईन्सचे नॉमिनी डायरेक्टर रॉबिन कामार्क यांनी राजीनामा दिला. संस्थापक-अध्यक्ष नरेश गोयल यांच्या राजीनाम्यानंतर इत्तिहादने जेटमध्ये नेमलेल्या नॉमिनी डायरेक्टर केव्हीन नाईट यांनी राजीनामा दिला होता. जेटमध्ये इत्तिहादचे 24 टक्के शेअर्स आहेत. इत्तिहादने आपले दोन संचालक मंडळावर नेमले होते. मात्र, आता दोघांनीही राजीनामा दिला आहे.

जेटचे शेअर्स 24 टक्क्यांनी कोसळले

दिवाळीखोरीत निघालेल्या जेट एअरलाईन्सचे शेअर्स महिन्याभरात मोठ्या प्रमाणात घसरले. संचालक मंडळातील सदस्य आणि कंपनीतील उच्च पदस्थांनी राजीनामा दिल्यानंतर महिनाभरात जेटचे शेअर्स तब्बल 24 टक्क्यांनी कोसळले आहेत. जेट पुन्हा हवेत झेपावण्यासाठी, ती विकत घेण्यासाठी तसेच तिचा लिलाव करण्यासाठी कंपन्या पुढे येत आहेत. मात्र, योग्य तो प्रस्ताव मिळत नसल्यामुळे जेटच्या विक्रीचे भिजत घोंगडे आहे तसेच आहे.