
झारखंडमध्ये एका जखमी हत्तीने धुडगूस घातला आहे. या पिसाळलेल्या हत्तीने दोन व्यक्तींना चिरडून मारले आहे तर यात दोन तरुणी जखमी झाल्या आहेत. त्यामुळे परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे.
झारखंड येथील खिरगाव मैला टांड हा रस्ता नागरिकांनी जाम करण्यात आला आहे. दामोदर साव आणि धनेश्वर साव हे दोघं सकाळी भेंडी लावलेल्या शेतात काम करण्यासाठी जात होते. त्याचवेळी हत्तीने त्यांच्यावर हल्ला केला. तिथेच काही अंतरावर गेल्यावर हत्तीने दोन महिलांवर हल्ला करुन जखमी केले. ज्यांना हजारीबाग येथील रुग्णालयात नेण्यात आले. मात्र त्यांची गंभीर अवस्था पाहता त्यांना रिम्स रेफर करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले आणि हत्तीला शोधण्यास सुरुवात केली. मात्र लोकांनी गर्दीच्या करुन रस्ता अडविल्याने त्यांना हत्तीचा शोध घेताना अडचणी आल्या.
वनविभागाचे एसीएफए के परमान यांनी सांगितले की, हत्ती जखमी असल्यामुळे तो धुडगूस घालत आहे. जखमी हत्ती हजारीबागच्या सरदार चौकात पोहोचला होता जिथून तो पुन्हा खीरगाव येथे आला. हत्तींचा हा खूप जुना रस्ता आहे त्यामुळे तो त्या परिसरात आला. मृतकांच्या कुटुंबियांनी नुकसान भरपाई आणि सरकारी नोकरीची मागणी केली आहे. हजारीबागच्या रेल्वे स्टेशनजवळ कचराकुंडीजवळ हत्ती असल्याचे कळले. ड्रोनच्या माध्यमातून वनविभाग आणि पोलीस प्रशासनाने नजर ठेवली आहे.

























































