आया ये शेरोंका ‘झुंड’ है! पाहा टीझर

994

सैराट या सुपरहिट चित्रपटानंतर नागराज मंजुळे त्याच्या आगामी ‘झुंड’ या चित्रपटामुळे चर्चेत होता. बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासोबत त्याचा चित्रपट म्हणजे प्रेक्षकांसाठी पर्वणी असेल, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. नुकताच प्रदर्शित झालेला झुंडचा टीझर त्या उत्सुकतेला शिगेला पोहोचवणारा ठरेल असं चित्र आहे.

सोमवारी झुंडचं पोस्टरही प्रदर्शित झालं होतं. त्या पोस्टरवर पाठमोरे बिग बी दिसत होते. पोस्टरच्या पार्श्वभूमीवर एक वस्ती दिसत होती. त्यामुळे चित्रपटाच्या कथेबाबत उत्कंठा निर्माण झाली होती. प्रदर्शित झालेल्या टीझरमध्ये 12-15 जणांचा एक चमू दिसत आहे. त्यांच्या हातात साखळी, बॅट, हॉकी स्टिक अशा वस्तू दिसत आहेत. पार्श्वभूमीला येणारा बिग बींचा दमदार आवाज आणि नंतर सुरू होणारं गाणं उत्सुकतेत भर टाकत आहे.

नागराज मंजुळे यांनी या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन केलं आहे. अमिताभ बच्चन या चित्रपटात एका क्रीडा प्रशिक्षकाची भूमिका साकारणार आहेत. येत्या 8 मे 2020 रोजी ‘झुंड’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

पाहा टीझर-

आपली प्रतिक्रिया द्या