जिओचे ग्राहक 40 कोटींवर, जुलैमध्ये 35 लाख नवे ग्राहक जोडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सर्वाधिक ग्राहक संख्या असलेल्या रिलायन्स जिओने आता 40 कोटी ग्राहकांचा टप्पा ओलांडला आहे. जुलै महिन्यात जिओला 35 लाख 50 हजार नवे ग्राहक जोडले गेले आहेत. दरम्यान जिओ सर्वाधिक ग्राहक असलेली टेलिकाॅम कंपनी ठरली असली तरी कोरोना काळातील स्थलांतरामुळे कंपनीच्या ऑक्टिव्ह ग्राहकांच्या संख्येत साडे आठ कोटीची घट झाली आहे.

ट्रायच्या आकडेवारीनुसार देशातील टेलिकाॅम ग्राहकांची एकूण संख्या 114.4 कोटी एवढी आहे. त्यापैकी रिलायन्स जिओकडे 40 कोटी ग्राहक असून एअरटेलच्या ग्राहक संख्येत 32 लाखाची वाढ झाल्याने त्यांचे एकूण ग्राहक 32 कोटींवर पोहचले आहेत. तर व्होडाफोन-आयडियाची ग्राहक संख्या 37 लाखाने कमी होऊन 30 कोटीपर्यंत खाली आली आहे. दरम्यान भलेही जिओचे 40 कोटी ग्राहक असले तरी त्यामध्ये इनऑक्टिव्ह ग्राहकांची संख्या साडे आठ कोटी आहे. तर एअरटेलचे एकूण ग्राहकांपैकी 97 टक्के ग्राहक ऑक्टिव्ह असून व्होडाफोन-आयडियाचे एकूण ग्राहकांच्या 89 टक्के ग्राहक ऑक्टिव्ह असल्याचे ट्रायच्या व्हिजिटर लोकेशन रजिस्टरमुळे समोर आली आहे.