जियोचा हा फोन घ्या आंणि मिळवा दोन वर्ष अनलिमिटेड फ्री कॉलिंग आणि डेटा, किंमत फक्त

रिलायन्स जियो हिंदुस्थानात 5 जी लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी जियोने सध्या २जी मुक्त भारत नावाचे अभियान सुरु केले आहे. त्यानुसार जियोने के ऑफर दिली असून ग्राहकांना दोन वर्ष फ्री अनलिमिटेड कॉलिंग आणि दिवसाला दोन जीबी डेटा मिळणार आहे.

जियोने एक ऑफर लॉन्च केली आहे. त्यानुसार ग्राहकांना 1499 आणि 1999 रुपयांची ऑफर देण्यात आली आहे. त्यात ग्राहकांना डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग सुविधा मिळणार आहे.

1999 च्या ऑफरमध्ये ग्राहकांना दोन वर्षे मोफत आणि अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळणार आहे. तर दिवसाला 2 जीबीचा 4G स्पीडचा डेटा मिळणार आहे. कीपॅडचा हा फोन असून त्यात गूगल, व्हॉट्सऍप, फेसबुक, युट्युब सारख्या ऍप्सचाही वापर करता येणार आहे.  तर दुसरी ऑफर 1499 रुपयांची सून त्यात याच ऑफर्स एक वर्षासाठी मिळणार आहे. इतकेच नाही तर तुमच्याकडे जियोचा फोन असेल तर 749चा रीचार्जवर या सेवा मिळणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या