
जम्मू कश्मीरच्या अनेक भागात शनिवारी दुपारी 10.14 वाजण्याच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. रिक्टर स्केलवर या भूंकपाची तीव्रता 4.3 असल्याची नोंद करण्यात आली आहे. या भूंकपामुळे जीवीत किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. या भूंकपाचा केंद्रबिंदू पाकिस्तानात असल्याची माहिती मिळाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून जम्मू कश्मीर आणि उत्तर हिंदुस्थानात भूंकपाचे धक्के जाणावत आहेत.





























































