अनंतनागमध्ये सुरक्षा दलावर ग्रेनेड हल्ला, सहा जवान गंभीर जखमी

जम्मू-कश्मीरमधील अनंतनाग मध्ये दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला असून यात 6 जवान गंभीर जखमी झाले आहेत. हा हल्ला अनंतनाग येथील उपायुक्त कार्यालयासमोर झाला आहे.

उपायुक्त कार्यालयाच्या प्रवेश द्वारावर बंदोबस्तासाठी तैनात सुरक्षा जवानांवर दहशतवाद्यांनी ग्रेनेड फेकले. त्यानंतर दहशतवाद्यांनी तिथून पळ काढला. यात 6 जवान गंभीर जखमी झाले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या