उत्तर प्रदेश सरकारला हात जोडून विनंती लॉकडाऊन लावा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तर प्रदेशात कोरोनाचा कहर सुरू असून रुग्णांना ऑक्सिजन मिळत नाही. डॉक्टरांची कमतरता आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आम्ही हात जोडून विनंती करतो दोन आठवडय़ांचा लॉकडाऊन लावा, असे अलाहाबाद उच्च न्यायालयाने म्हटले आहे.

गेल्या आठवडय़ात उच्च न्यायालयाने सहा शहरांत लॉकडाऊनचे आदेश दिले होते. मात्र मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकार सर्वोच्च न्यायालयात गेले. सर्वोच्च न्यायालयाने या निर्णयाला स्थगिती दिली होती. बुधवारी न्यायमूर्ती सिद्धार्थ वर्मा यांच्या खंडपीठापुढे पुन्हा सुनावणी झाली तेव्हा त्यांनी हात जोडून विनंती करतो, लॉकडाऊन लावा, अशी सूचना केली आहे.