राज्यातील पत्रकार, कॅमेरामनना तत्काळ फ्रंटलाइन वर्कर्स घोषित करा, देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यातील वर्तमानपत्रे आणि टीव्ही चॅनेलमधील सर्व पत्रकार, कॅमेरामनना तत्काळ फ्रंटलाइन वर्कर्स घोषित करून लसीकरणात प्राधान्य देण्याची मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

देशातील सुमारे बारा राज्यांमध्ये प्रसिद्धी आणि दृकश्राव्य माध्यमांतील पत्रकारांना फ्रंटलाइन वर्कर्स म्हणून जाहीर करण्यात आले आहे. दुर्दैवाने, महाराष्ट्रात मात्र हा निर्णय अद्यापही प्रलंबित आहे. राज्यातील अनेक ज्येष्ठ पत्रकार, पत्रकारांच्या विविध संघटना यासंदर्भात सातत्याने मागणी करीत आहेत. कोरोना साथीच्या पहिल्या लाटेत आपण अनेक पत्रकारांना मुकलो. या दुसऱया लाटेत सुद्धा बळी पडलेल्यांची संख्या मोठी आहे. अशात त्यांच्या सुरक्षेची, जीवितेची काळजी घेणे हे आपले कर्तव्य आहे. त्यांना फ्रंटलाइन वर्कर्स जाहीर केल्यास आपसूकच लसीकरणात त्यांना प्राधान्य मिळेल, अशी सूचना देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. दरम्यान, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून पत्रकारांना प्रंटलाइन वर्कर्स म्हणून घोषित करा अशी विनंती केली आहे.