
सामना ऑनलाईन । कोलकाता
सामान्य स्त्रियांना आणि मुलींना छेडछाड, पाठलाग, इव्ह टीझिंग अशा घटनांना सामोरे जावे लागते. पण, यातून अभिनेत्रीही सुटलेल्या नाहीत हे पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे. एका ३२ वर्षीय अभिनेत्रीचा पाठलाग केल्याप्रकरणी अभिनेता संजय उर्फ जॉय मुखर्जी याला अटक करण्यात आली आहे.
जनसत्ताने दिलेल्या माहितीनुसार, ही अभिनेत्री शुक्रवारी आपल्या जिममधून घरी परतत होती. तेव्हा संजय याने गाडीतून तिचा पाठलाग केला. वाटेत त्याने आपल्या गाडीचा वेग वाढवला आणि अभिनेत्रीच्या गाडीला रोखण्याचाही प्रयत्न केला. अभिनेत्रीने पुन्हा गाडी पुढे चालवायचा प्रयत्न करताच त्याने गाडीतून उतरून तिच्या सहकाऱ्यावरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला.
Kolkata: Police arrested Bengali actor Joy Mukherjee yesterday, on charges of assaulting actress Sayantika Banerjee. Mukherjee has been produced before Alipore court today. #WestBengal pic.twitter.com/XR6TlVe8W6
— ANI (@ANI) July 7, 2018
यानंतर स्वतःची सुटका करून घेत या अभिनेत्रीने पोलीस स्टेशन गाठलं आणि संजयविरुद्ध तक्रार दाखल केली. तिच्या म्हणण्यानुसार, त्याने यापूर्वीही तिचा पाठलाग केला होता, पण तिने त्याकडे दुर्लक्ष केलं होतं. संजयला पोलिसांनी अटक केली असून या घटना घडली त्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
























































