कंगनाचा जजमेंटल है क्या चित्रपट ऑनलाईन लिक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन/ मुबंई

मोठ्या वादानंतर अभिनेत्री कंगना रनौत हिचा ‘जजमेंटल है क्या’ हा चित्रपट शुक्रवारी रिलीज झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. एकीकडे चित्रपट बॉक्स ऑफिसवर हीट होत असतानाच हा चित्रपट ऑनलाईन लिक झाला आहे. शुक्रवारी चित्रपट रिलीज झाल्याच्या काही तासानंतरच तमिळ रॉकर्सने त्यांच्या वेबसाईटवर या चित्रपटाची एच डी प्रिंट लिक करण्यात आली आहे.

‘जजमेंटल है क्या’ या चित्रपटाला समिक्षकांनी चांगले रेटिंग्स दिले आहेत. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने पहिल्याच दिवशी जवळपास 7-8 कोटींची कमाई केली आहे. मात्र आता हा चित्रपट ऑनलाईन लिक झाल्यामुळे या चित्रपटाच्या कमाईवर परिणाम होण्याची शक्यता आहे. तमिळ रॉकर्सने याआधी देखील बरेचसे हीट चित्रपट ऑनलाईन लिक केले आहेत.

चित्रपटाची कहाणी बॉबी म्हणजेच (कंगना रनौत) आणि केशव (राजकुमार राव) या दोन मानसिक रूग्णांवर आधारित आहे. एकता कपूर, शोभा कपूर आणि शैलेश आर.सिंह यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे.