
चौथीही मुलगीच झाली म्हणून निराश झालेल्या एका पित्याने त्याच्या तीन मुलींना विहरीत ढकलून स्वत: आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार गुजरातमधील जुनागढ येथे घडली आहे. या घटनेत तीनही मुलींचा आणि पित्याचा मृत्यू झाला आहे.
भेसाण तालुक्यातील खंभालिया गावातील ग्राम रक्षा दलाचे जवान रसिक देवाभाई सोलंकी यांना तीन मुली होत्या. काही दिवसांपूर्वीच त्यांच्या पत्नीची प्रसूती झाली होती व त्यांना चौथीही मुलगी झाली होती. सोलंकी यांची पत्नी ही तिच्या माहेरी होती. गुरुवारी रसिक सोलंकी त्यांच्या मुली रिया (9), अंजली (7), जल्पा(2) यांना घेऊन फिरायला गेले होते. त्यानंतर त्यांनी गावाबाहेर असलेल्या एका मोठ्या विहरीत मुलींना ढकलले. त्यानंतर त्यांनी घरी येऊन गळफास लावून घेतला. यात तिनही मुलींचा व रसिक यांचा मृत्यू झाल आहे. या घटनेचा रसिक यांच्या पत्नीला जबर धक्का बसला आहे.

























































