
पूर्व द्रुतगती मार्गावरील जोगेश्वरी-विक्रोळी उड्डाणपूल उद्या रविवारी सकाळी सहा वाजेपासून वाहतुकीसाठी सुरू करण्यात येणार आहे. नियोजित वेळापत्रकाच्या दोन दिवस आधीच काम पूर्ण करण्यात यश आले आहे.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत जोगेश्वरी-विक्रोळी उड्डाणपुलाचे सांधे बदलण्यासाठी 13 मेपासून वाहतूक बंद करण्यात आली होती. वाहतूक पोलिसांनी 24 मेपर्यंत ट्रफिक ब्लॉक दिला होता. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी महामंडळाने कंत्राटदाराला वेगाने काम करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार, शनिवारी काम पूर्ण झाले आहे. वाहतूक पोलिसांनी मंजूर केलेल्या वेळापत्रकाच्या दोन दिवस आधीच दुरुस्तीचे काम पूर्ण झाले आहे.



























































