काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर काय म्हणाले सिंधिया; वाचा…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्ये प्रदेश काँग्रेसचा दिग्गज नेते असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांनी मंगळवारी पक्षाचा राजीनामा दिला आहे. सिंधिया यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी आपला राजीनामा काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पाठवला आहे. आज तक या वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, सिंधिया हे मांगवारी सायंकाळी भाजपमध्ये प्रवेश करू शकतात. त्यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांचीही भेट घेतली आहे.

याच दरम्यान सिंधिया यांच्याशी अनेक पत्रकार संवाद साधण्याचा प्रयत्न करीत आहे. यावेळी पत्रकारांच्या कचाट्यात अडकलेल्या सिंधीयाना पत्रकारांनी त्याच्या राजीनाम्याबाबत आणि भाजप प्रवेशाबाबत अनेक प्रश्न केले. मात्र त्यांनी पत्रकरांच्या प्रश्नाचे कोणतेही उत्तर न देत फक्त ‘हॅपी होळी’ आणि ‘थँक्यू’ म्हणाले आणि काढता पाय घेतला.

राज्यसभेचे सदस्य होतील?

ज्योतिरादित्य सिंधिया यांचा भाजपमध्ये प्रवेशानंतर भाजप त्यांना राज्यसभेवर पाठवू शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. तसेच त्यांना केंद्राच्या मोदी सरकारमध्ये मंत्रिपदही मिळू शकते, अशीही चर्चा आहे. दरम्यान, आतापर्यंत  मध्य प्रदेशमधील कमलनाथ सरकारच्या 22 आमदारांनी राजीनामे दिले आहेत. या आमदारांच्या राजीनाम्याने कमलनाथ सरकारची पडझड जवळपास निश्चित झाल्याचे समजते आणि भाजप पुन्हा एकदा मध्य प्रदेशात सरकार स्थापन करण्याच्या स्थितीत आली असल्याचे दिसत आहे.