
ताडोबा व्याघ्रप्रकल्पाच्या धर्तीवर साताऱयाजवळील कासच्या निबीड अरण्यात मंगळवारपासून (दि. 19) रात्रीची जंगल सफारी सुरू होत आहे. सातारा वनविभाग व कास पठार कार्यकारी समितीच्या समन्वयातून हा अनोखा उपक्रम सुरू होत असून, त्यादृष्टीने जंगल सफारीचा फील आणि थ्रील देऊ शकतील, अशा दोन गाडय़ा तयार करण्यात आल्या आहेत. निसर्ग पर्यटनाची आवड असणाऱयांना आता हा रोमांचक अनुभव सातारच्या परिसरात घेता येणार आहे.
सातारा शहरापासून जवळच असलेल्या कास पुष्प पठाराला युनेस्कोने जागतिक वारसास्थळाचा दर्जा दिला आहे. सातारच्या पश्चिमेचा हा संपूर्ण परिसर निसर्गसंपन्न आहेच, शिवाय जैवविविधतेच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील आहे. कास पुष्प पठारावरील विविधरंगी रानफुलांचे गालिचे पाहण्यासाठी देशविदेशातून हजारो पर्यटक दरवर्षी येत असतात. या व्यतिरिक्त या परिसरात घनदाट जंगल, त्यातील वन्यप्राण्यांचा संचार याचा प्रत्यक्ष अनुभव घेणे हे मोठे थ्रील असते. ती संधी सातारचे उपकनसंरक्षक महादेक मोहिते यांच्या संकल्पनेतून ‘नाईट जंगल सफारी’च्या माध्यमातून उपलब्ध झाली आहे.
कास पुष्प पठाराचा हंगाम साधारणतः जुलै ते सप्टेंबरदरम्यान बहरतो. पण, निसर्गाच्या ओढीने कास परिसरात पर्यटकांना बारमाही येता यावे व त्याद्वारे स्थानिकांना रोजगार निर्मिती व्हावी, या हेतूने नाईट जंगल सफारी सुरू करण्यात येत आहे. या सफारीसाठी तयार केलेल्या वाहनांकडे पाहूनच जंगल सफारीचा माहोल तयार होईल.
नाईट जंगल सफारीचा मार्ग
कास पुष्प पठार – घाटाई फाटा – घाटाई देकी मंदिर – कांजुळकाडी – कास तलाक – कास मंदिराच्या पुढील बाजूने तांबी फाटा – पाली, तांबी – धाकली – जुंगटी – कात्रेकाडी – परत तांबी फाटा – अंधारी – कोळघर – सह्याद्रीनगर – चिकनकाडी – मोळेश्कर – एकीक – पारंबे फाटा परत कास पुष्प पठार. असा हा 50 किलोमीटरचा मार्ग असणार आहे. गाडीमध्ये या जंगलाची खडान्खडा माहिती असलेला चालक व गाईड सोबत असणार आहे.
3 तासांची जंगल सफारी
नाईट जंगल सफारीच्या दोन गाडय़ा प्रथम सायंकाळी सातच्या सुमारास मार्गस्थ होतील. यापैकी एक गाडी घाटाईच्या बाजूने जाईल, तर दुसरी गाडी एकीवच्या बाजूने जाईल. या गाडय़ा भटकंती करून माघारी आल्यानंतर चालकांचे जेवण झाल्यावर पुन्हा रात्री साडेदहाच्या सुमारास सफारीवर जातील. ही जंगल सफारी तीन तासांची असणार आहे. या उपक्रमाला कसा प्रतिसाद मिळतोय, ते पाहून उपक्रमाची व्याप्ती वाढविण्यात येणार आहे.
एका ग्रुपला चार हजार खर्च
नाईट जंगल सफारीचा रोमांच अनुभवण्यासाठी आठ ते नऊ जणांच्या एका ग्रुपला चार हजार रुपये खर्च येणार आहे. महत्त्वाचे म्हणजे यासाठी कासच्या संकेतस्थळावर आधी नोंदणी करणे आवश्यक आहे.


























































