कैलास मानसरोवर परिसरात चीनचे क्षेपणास्त्र तळ, हिंदूच्या महत्त्वाच्या यात्रेवर लालमाकडांचा `वॉच’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लडाखच्या सीमेवर कुरुपती कायम ठेवतानाच चीनने आता धार्मिक स्थळांवर, यात्रांवर ‘वॉच’ ठेवण्यास सुरवात केली आहे.कोट्यवधी हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या कैलास मानसरोवर परिसरात चीनच्या पीपल्स लिब्रेशन आर्मीने क्षेपणास्त्र तळ उभारला असल्याचे खळबळजनक वृत्त आहे.

जमिनीवरून हवेत मारा करणारे अत्यंत शक्तिशाली मिसाईल सिस्टिम चीन येथे तैनात करणार आहे. ‘इंडिया टुडे’ने सॅटेलाईट इमेजच्या आधारे यासंबंधीचे वृत्त दिले आहे. कैलास पर्वत आणि मानसरोवर हे पवित्र धार्मिक स्थळं आहेत. ही यात्रा अत्यंत खडतर असली तरी दरवर्षी हजारो हिंदू भाविक कैलास मानसरोवर यात्रेला दर्शन घेण्यासाठी जातात. हिंदुस्थानने लिपुलेख पासपर्यंत १७ हजार फुट उंचीवर ८० किलोमीटरचा रस्ता बांधला आहे. या रस्त्यामुळे भाविकांचा वेळ वाचणार आहे.मात्र चीनने त्यांच्या बाजूने क्षेपणास्त्र तळ उभारण्याचे काम एप्रिलमध्ये सुरु केले आणि आता ते पूर्ण झाले झाल्याचे वृत्त आहे. चीनचे हे तळ कैलास मानसरोवर यात्रा मार्गाच्या परिसरात आहे. धार्मिकस्थळांवर वॉच ठेवण्यासाठी, येथे मोठ्याप्रमाणावर लष्करीकरण करण्याचा चीनचा कट आहे.

-अत्याधुनिक क्षेपणास्त्र प्रणाली आणि रडार
-मानसरोवर भागात जमिनीवरुन हवेत मारा करणारी एचक्यू -९ सॅम मिसाइल सिस्टिम तैनात केली जाणार आहे.
– वाहनआधारीत रडार यंत्रणाही सज्ज असेल. त्याशिवाय टार्गेटला शोधण्यासाठी घातक रडार्सही चिन येथे बसवणार आहे.