कल्याण भाजप गणपत गायकवाडांसोबतच!

मिंधे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण लोकसभा मतदारसंघातील कायदा-सुव्यवस्थेचे कसे तीनतेरा काजले आहेत याची आमदार गणपत गायककाड यांनी वेळोवेळी तक्रार करूनही भाजपचे शीर्षस्थ नेते असलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोयीस्कर दुर्लक्ष केले. आता गोळीबारानंतरही गणपत गायकवाड यांना पक्षात एकटे पाडण्याचा घाट घातला जात असल्याने कल्याण-डोंबिवलीतील भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते संतप्त आहेत. त्यामुळे वरिष्ठ नेत्यांनी हात वर केले तरी बेहत्तर, आम्ही गणपत गायकवाडांच्या पाठीशी ठाम राहणार. मिंध्यांशी कदापी तडजोड करणार नाही, असा इशारा कार्यकर्त्यांनी आज बैठकीत दिला.

दोन दिवसांपूर्वीच माजी आमदार नरेंद्र पवार यांनी कल्याणमधील भाजप आणि शिंदे गटातील काद सोडवण्यात वरिष्ठ नेते कमी पडल्याचा घरचा आहेर दिला होता. त्यानंतर आज भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या समर्थनार्थ कल्याण पूर्क भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते पुढे आले. याबाबत भाजप पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी ही बैठक कार्यकर्त्यांचे खच्चीकरण होऊ नये, पक्षाचे विविध कार्यक्रम राबवले जावेत यासाठी होती, असे सांगून अन्य काही बोलण्यास नकार दिला. मात्र बैठकीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या भूमिकेविषयी कार्यकर्त्यांनी तिखट शब्दांत नाराजी क्यक्त केल्याची माहिती आहे. जरी उपमुख्यमंत्री देकेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष आणि अन्य नेत्यांनी ठाम भूमिका घेतली नसली तरी कल्याण, डोंबिवलीतील पदाधिकारी आणि कार्यकर्ते आमदार गणपत गायकवाड यांच्या पाठीशी ठामपणे राहणार असल्याचे सांगितले. याच वेळी मिंधे गटाच्या झुंडशाहीसमोर न झुकण्याचा निर्धारही कार्यकर्त्यांनी केला.

आज मेडिकल होणार
आमदार गणपत गायकवाड यांच्यासह हर्षल वेणे आणि संदीप सरकणकर यांची उद्या मेडिकल होण्याची शक्यता आहे. कळवा पोलीस कोठडीत गणपत गायककाड यांना ठेकण्यात आले आहे. तर बाकीच्या दोघांना ठाणे नगर पोलीस स्टेशनच्या कोठडीत ठेवण्यात आले आहे. दरम्यान सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस स्टेशनमध्ये मेडिकल होण्याची शक्यता आहे. सिव्हिल रुग्णालयातील डॉक्टरांचे पथक सकाळी तपासणी करण्यास येणार आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱयांनी दिली.

पोलिसांची बघ्याची भूमिका
कल्याण पूर्वेमध्ये गणपत गायकवाड आणि महेश गायकवाड यांची संपर्क कार्यालये शंभर मीटरच्या अंतरात आहेत. दोन्ही गटांचे कार्यकर्ते कार्यालयाबाहेर दिवस-रात्र बेकायदा जमाव करून असतात. त्यामुळे परिसरात तणाक आहे. गोळीबाराच्या गंभीर घटनेनंतरही पोलीस अजूनही बघ्याची भूमिका घेत असल्याने नागरिकांमध्ये संताप आहे.