कल्याण-डोंबिवलीत मंगळवारी पाणीबाणी, फिडर सबस्टेशनच्या देखभाल दुरुस्तीचे काम

water-cutting

22 के. व्ही. एनआरसी-2 फिडर सबस्टेशनच्या देखभाल दुरुस्तीचे काम महावितरण करणार असल्याने येत्या मंगळवारी कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या काही भागात आठ तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी जपून पाणी वापरावे असे आवाहन करण्यात आले आहे.

22 के. व्ही. एनआरसी-2 फिडर या सबस्टेशनवरून मोहिली उदंचन केंद्र आणि 100 एमएलडी मोहिली जलशुद्धीकरण केंद्राला वीजपुरवठा केला जातो. दुरुस्तीच्या कामामुळे हा वीजपुरवठा मंगळवारी खंडित होणार असल्याने नेतिवली आणि मोहिली जलशुद्धीकरण केंद्र पूर्णतः बंद ठेवावे लागणार आहे. त्यामुळे मंगळवारी 13 मे रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत आठ तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

या परिसरातील पाणी बंद राहणार
कल्याण ग्रामीणमधील मांडा, टिटवाळा, वडवली, आंबिवली, शहाड, अटाळी, कल्याण पश्चिम विभागातील काही परिसर, डोंबिवली पूर्व तसेच परिचमच्या काही परिसरात पाणीपुरवठा बंद राहणार आहे अशी माहिती कल्याण-डोंबिवली महापालिकेने दिली.