कल्याण-ठाकूर्ली दरम्यान ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. कल्याण ठाकुर्ली जवळ रेल्वेच्या रांगा लागल्या आहेत. गेल्या तासाभरापासून डाऊन मार्गावरील वाहतूक बंद असल्याने अनेक प्रवाशांनी ट्रॅकवरून चालायला सुरुवात केली आहे.