वीकएण्डला टिटवाळा येथे गर्डर लॉन्चिंगसाठी सलग दोन ब्लॉक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कल्याण आणि टिटवाळा रेल्वे स्थानकांदरम्यान जुना पादचारी पूल हटविण्यासाठी आणि नव्या पादचारी पुलाचा गर्डर टाकण्यासाठी मध्य रेल्वेने शुक्रवारी आणि शनिवारी मध्यरात्री सलग दोन पॉवरब्लॉक जाहीर केले आहेत. त्यामुळे अनेक उपनगरीय लोकल तसेच लांब पल्ल्याच्या गाडय़ांवर त्याचा परिणाम होणार असल्याने या वीकएण्डला रात्रीचा प्रवास करण्यापूर्वी मुंबईकरांनी ब्लॉकचे वेळापत्रक पाहूनच प्रवासाचे बेत आखावेत असे आवाहन करण्यात आले आहे.

टिटवाळा येथे पादचारी पुलाच्या गर्डर लॉन्चिंग आणि डी-लॉन्चिंगसाठी मध्य रेल्वेचा पहिला पॉवर ब्लॉक शुक्र.-शनि. दरम्यान घेतला जाणार असून तो मध्यरात्री 2 ते पहाटे 6 वाजेपर्यंत चालणार आहे. तर दुसरा पॉवर ब्लॉक शनि.-रवि. दरम्यान मध्यरात्री रात्री 11.50 ते पहाटे 3.50 वाजेपर्यंत चालणार आहे.

रद्द होणाऱया लोकल ट्रेन –

13 मार्च रोजी सीएसएमटीहून रात्री 10.51 वा. सुटणारी टिटवाळा लोकल, 14 मार्च रोजी कल्याणहून सकाळी 5.28 वा. सुटणारी आसनगाव लोकल, सीएसएमटीहून सकाळी 4.15 वा. सुटणारी कसारा लोकल, विद्याविहारहून सकाळी 4.51वा. सुटणारी टिटवाळा लोकल, विद्याविहारहून सकाळी 5.12 वा. सुटणारी टिटवाळा लोकल, टिटवाळय़ाहून सकाळी 4.32 वा. सुटणारी सीएसएमटी लोकल, टिटवाळय़ाहून सकाळी 5.35 वा. सुटणारी सीएसएसटी लोकल, 14 मार्च रोजी सीएसएमटीहून रात्री 10.00 वा. सुटणारी टिटवाळा लोकल, सीएसएमटीहून रात्री 10.51 वा. सुटणारी टिटवाळा लोकल, सीएसएमटीहून रा. 11.44 वा. सुटणारी टिटवाळा लोकल, टिटवाळय़ाहून रा. 9 वा. सुटणारी सीएसएमटी लोकल, टिटवाळ्य़ाहून रा. 10.06 वा. सुटणारी सीएसएमटी लोकल.

13 मार्चच्या रद्द झालेल्या गाडय़ा

नांदेड-सीएसएमटी राज्यराणी एक्प्रेस, अमरावती एक्प्रेस, नंदिग्राम एक्प्रेस, भुसावळ
पॅसेंजर

15 मार्चच्या रद्द केलेल्या गाडय़ा

मनमाड-एलटीटी एक्प्रेस, नांदेड-सीएसएमटी राज्यराणी, अमरावती एक्प्रेस, नंदिग्राम एक्प्रेस, भुसावळ पॅसेंजर, एलटीटी-मनमाड एक्प्रेस.