‘ही’ अभिनेत्री साकारणार जयललितांची भूमिका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । चेन्नई

तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या जीवनावर येणाऱ्या ‘थलैवी’ या चित्रपटात मुख्य भूमिका कोणती अभिनेत्री करणार याबाबत फार उत्सुकता लागली होती. आज या चित्रपटाचे निर्माते एएल विजय यांनी आज या चित्रपटातील मुख्य अभिनेत्रीची घोषणा केली आहे. या चित्रपटात अभिनेत्री कंगना रनौत ही जयललितांची भूमिका साकारणार आहे.

आज कंगना रनौत हिचा 32 वा वाढदिवस आहे. या दिवसाचा मुहुर्त साधून दिग्दर्शकाने कंगनाच्या भूमिकेची घोषणा केली. थल्लायवी हा चित्रपट तमिळ,तेलुगू, हिंदी या तीन भाषांमध्ये येणार आहे. 24 फेब्रुवारीला जयललिता यांच्या 71 व्या जयंती निमित्त या चित्रपटाची घोषणा केली होती. या चित्रपटासाठी प्रोडक्शन टीमने जयललिता यांचा भाचा दीपक यांच्याकडून ना हरकत प्रमाणपत्र घेतले आहे.

kangna