कणकवलीत लसीकरणासाठी शिवसेनेची मोफत रिक्षा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शहरातील सतराही प्रभागातील कोविड लसीकरणासाठी शासन नियमानुसार पात्र असलेल्या शहरवासीयांना व ज्येष्ठ नागरिकांना लसीकरणासाठी उपजिल्हा रुग्णालयात येण्या-जाण्यासाठी रिक्षाची मोफत सुविधा शहर शिवसेनेकडून उपलब्ध करून देण्यात येणात आली आहे. नगरसेवक सुशांत नाईक यांच्यासह सर्वच पदाधिकारी आपापल्या विभागातील ग्रामस्थांना लसीची सुरक्षा मिळण्यासाठी नियोजन करत आहे. सलग पाच दिवस कणकवली शहर शिवसेनेच्या वतीने सतरा प्रभागांमध्ये नागरिकांसाठी ही सुविधा उपलब्ध असणार आहे. यासाठी प्रभागनिहाय प्रत्येक पदाधिकारी कार्यकर्त्यावर जबाबदारी निश्चित करून देण्यात आली आहे. लाभार्थ्यांना त्यांच्या घरापासून लसीकरण सेंटरपर्यंत रिक्षाची व्यवस्था करण्यात आली आहे. दुपारपर्यंत सुमारे 100 जणांचे रजिस्ट्रेशन करून झाले होते व आणखीही शहरातील नागरिक या सुविधेचा लाभ घेत होते अशी माहिती शिवसेनेचे गटनेते नगरसेवक सुशांत नाईक यांनी दिली.