लढवय्ये कपिल पाजी फिट, क्रिकेट चाहते आनंदी

हिंदुस्थानचे महान अष्टपैलू क्रिकेटपटू कपिल देव यांच्या छातीमध्ये दुखू लागल्यानंतर त्यांच्यावर शुक्रवारी अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली.

नवी दिल्लीतील पहर्टिस हॉस्पिटलमध्ये डॉ. अतुल माथुर यांच्या टीमच्या देखरेखीखाली त्यांना ठेवण्यात आले होते. कपिल देव लवकरात लवकर बरे व्हावे यासाठी जगभरातील चाहत्यांकडून प्रार्थनाही करण्यात आली.

आता लढवय्ये कपिल देव फिट असल्याचा फोटो सोशल साइटवर शनिवारी माजी क्रिकेटपटू चेतन शर्मा यांच्याकडून टाकण्यात आला. हा फोटो पाहून चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

सोशल साइटवर टाकण्यात आलेल्या पह्टोमध्ये कपिल देव यांच्यासोबत त्यांची कन्या अमया दिसत आहे. या छायाचित्रात कपिल देव आपण फिट असल्याचे थम्स अप करून चाहत्यांना सांगत आहेत. याप्रसंगी चेतन शर्मा यांनी म्हटले की, कपिल पाजी आता फिट झाले असून ते आपली मुलगी अमया हिच्यासोबत आनंदी दिसत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या