कराडमध्ये सलग दुसऱ्या दिवशी खून

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शहरात सोमवारी रात्री घडलेल्या खुनाची घटना ताजी असतानाच, मंगळवारी रात्री आणखी एक खून करण्यात आला आहे. धारदार शस्त्र्ााने वार केल्यानंतर डोक्यात फरशी घालून तरुणाचा खून झाल्याची घटना कराडच्या भाजीमंडई परिसरात घडली आहे. हत्येनंतर तीन हल्लेखोर फरार झाले असून, खुनाचे कारण समजू शकले नाही. दरम्यान, सलग दोन दिवसांत दोन खून झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. जुबेर जहांगीर आंबेकरी (वय 30, रा. कुरेशी मोहल्ला, कराड) असे खून झालेल्याचे नाव आहे.

भाजीमंडई परिसरात जुबेर याचे मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास भांडण सुरू होते. यावेळी तीन संशयितांनी त्याच्यावर चाकूने वार करून हल्ला केला. यानंतर त्याच्या डोक्यात फरशी घालून त्याचा खून करण्यात आला. जुबेरला उपचारांसाठी वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला,

पोलीस उपअधीक्षक डॉ. रणजीत पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील, सहायक पोलीस निरीक्षक विजय गोडसे यांनी घटनास्थळी भेट दिली आहे.

बाराडबेरतील खूनप्रकरणात तीन अल्पवयीन ताब्यात

कराडमध्ये गेल्या दोन दिवसांत सलग दोन खून झाल्याने शहरात खळबळ माजली आहे. बाराडबरे परिसरात एका अल्पवयीन मुलाचा धारदार शस्त्र्ााने वार करून निर्घृण खून केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी तीन अल्पवयीन संशयितांना ताब्यातही घेतले.