कराडचा 35 वर्षीय तरुण कोरोना बाधित, सातारा जिल्ह्यात 3 रुग्ण; 18 रिपोर्ट निगेटिव्ह

2970

बुधवारी 1 एप्रिल रोजी कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथे दाखल असणा-या 19 अनुमानित रुग्णांच्या अहवाला पैकी एका 35 वर्षीय तरुणाला कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे.  एन.आय. व्ही. पुणे यांनी याबाबत माहिती दिली आहे. यामुळे सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या तीन झाली आहे. तसेच इतर 18 अनुमानित रुग्णांचे अहवाल निगटिव्ह असल्याचेही एन.आय.व्ही. पुणे यांनी कळविले आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.

कराड येथील कृष्णा मेडिकल कॉलेज येथे दाखल असणाऱ्या 19 अनुमानित रुग्णांचा रिपोर्ट तपासणीसाठी पाठवलेल्या अहवालामधील 35 वर्ष पुरुष तरूणाचा कोरोना बाधित अहवाल आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील आकडा 3 वर गेला आहे.

एकूण दाखल – 104
जिल्हा शासकीय रुग्णालय- 73
कृष्णा हॉस्पीटल, कराड- 30
खासगी हॉस्पीटल- 1
कोरोना नमुने घेतलेले- 104
कोरोना बाधित अहवाल – 3
कोरोना अबाधित अहवाल – 97
अहवाल प्रलंबित – 4
डिस्चार्ज दिलेले- 97
सद्यस्थितीत दाखल- 7
आलेली प्रवाशी संख्या (1 एप्रिलपर्यंत) 554
होम क्वारंटाईन असलेल्या व्यक्ती – 554

आपली प्रतिक्रिया द्या