कर्जत नगरपालिका निवडणूक, शिवसेनेच्या उमेदवारांनी मतदारांची घेतली घरोघरी जाऊन भेट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, कर्जत

कर्जत नगरपालिकेची निवडणूक जवळ येत चालली असून आजचा रविवार हा जणू प्रचारवार ठरला. शिवसेनेच्या बाराही उमेदवारांनी मोठय़ा धूमधडाक्यात प्रचार सुरू केला असून आज सकाळपासूनच मतदारांच्या घरोघरी जाऊन त्यांची भेट घेतली. प्रत्यक्षात भेटीवरच उमेदवारांनी अधिक भर दिला असून आगामी निवडणुकीत परिवर्तन घडवून नगरपालिकेवर भगवा भडकवण्याचा निर्धार करण्यात आला आहे.

कर्जत नगरपालिका निवडणूक प्रचाराचा महायुतीचा नारळ शनिवारी फुटल्यानंतर उमेदवार आपापल्या भागातील विकासनामा घेऊन मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत. आज सकाळी गुंडगे , दहिवली, अंकुरले, मुद्रे, भिसेगाव या भागात प्रचाराची सुरुवात सकाळपासून करण्यात आली. कपालेश्वर अपार्टमेंट, कपिला अपार्टमेंट, पुरी हाऊस, गोकुळ सोसायटी, मधुमाला सोसायटी, कळमवाडा, कापरेकर वाडा या भागांमध्ये दिवसभर प्रचाराची रणधुमाळी सुरू होती.

कर्जत नगरपालिकेत यावेळी परिवर्तन करायचेच या निर्धाराने शिवसेना महायुतीसह पूर्ण ताकदीने उतरली असून कर्जतचे मतदारही शिवसेनेच्या प्रचार फेऱयांना प्रचंड प्रतिसाद देत आहेत. प्रत्येक वॉर्डात नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सुवर्णा जोशी यांचे स्वागत नागरिक मोठय़ा प्रेमाने करत असल्याचे चित्र दिसत आहे. आज वॉर्ड क्रमांक 9 गुंडगे, वॉर्ड क्रमांक 6 भेसेगाव, वॉर्ड क्रमांक 2, 3, 4 दहिवली, वॉर्ड क्रमांक 1 मुद्रे या भागातील उमेदवारांनी प्रचाराचा नारळ फोडून प्रचाराला सुरुवात केली.

नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
शिवसेनेचे उमेदवार अरुणा कायकर, मनीषा भासे, संकेत भासे, किकेक दांडेकर, प्राची डेरकणकर, नितीन साकंत, संचिता पाटील, यमुताई किचारे, राहुल डाळिंबकर, पूनम बोबडे, कैशाली मोरे, महेंद्र कानिटकर यांनी आज रविवारची संधी साधून शिवसैनिकांसह मतदारांची भेट घेतली. तसेच त्यांच्या अडचणीही समजून घेतल्या. डेक्कन जीमखाना, खाटीकआळी, पाटीलआळी, बौद्धवाडा, दगडेआळी येथे मतदारांचा शिवसेनेच्या उमेदवारांना मोठा प्रतिसाद मिळाला.

हे प्रश्न सोडवणार
शहरातील रस्ते गल्ल्या, शुद्ध पाणी, अखंडित वीजपुरवठा, खेळासाठी मैदाने, क्रीडासंकुल, चांगली उद्याने, घरपट्टी आणि पाणीपट्टीचा प्रलंबित प्रश्न, भूमिगत गटारे, भूमिगत वीजवाहिन्या, अद्यावत आणि सर्व सोयींनी युक्त अशी स्मशानभूमी हे प्रश्न असून ते सोडवण्यासाठी शिवसेनेने वचन दिले आहे.