कर्जतमध्ये शिवसेनेने प्रचाराचा नारळ फोडला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी ।कर्जत

कर्जतमध्ये शिवसेनेने काल प्रचाराचा नारळ फुटल्यानंतर प्रचारात मुसंडी मारली असून प्रत्येक वॉर्डात उमेदवार आपले परिचय पत्रक लोकांपर्येन्त पोचवत आहेत. आज सकाळी गुंडगे , दहिवली ,अंकुरले, मुद्रे,भिसेगाव,या भागात प्रचाराची सुरवात सकाळ पासून झाली आहे.

कर्जत नगरपालिकेत या वेळी परिवर्तन करायचेच या निर्धाराने शिवसेना उतरली असून कर्जतचे मतदारही शिवसेनेच्या प्रचार फेऱ्यांना प्रचंड प्रतिसाद देत आहेत. प्रत्येक वॉर्डात सुवर्ण केतन जोशी यांचे स्वागत नागरिक मोठ्या प्रेमाने करत असल्याचे चित्र दिसत आहे. नगराध्यक्ष पदाचे शिवसेनेचे उमेदवार सुवर्णा केतन जोशी यांनी काल प्रचाराला सुरुवात केल्यानंतर आज वॉर्ड क्रमांक 9 गुंडगे ,वॉर्ड क्रमांक 6 भेसेगाव,वॉर्ड क्रमांक 2 ,3,4 दहिवली ,वॉर्ड क्रमांक 1 मुद्रे या भागातील उमेदवारांनी आपल्या प्रचाराचा नारळ फोडून प्रचाराला सुरवात केली आहे. राष्ट्रवादीच्या पेक्षा दोन पावले पुढे राहत शिवसेनेने प्रचारात जोरदारमुसंडी मारली असून प्रत्येक उमेदवाराचे परिचय पत्रक घेऊन आज उमेदवारांनी आपली पत्रके आप आपल्या वॉर्डात वाटून मतदारणपर्येंत पोचली आहेत.पहिलीच दिवसात जवळपास सर्व वॉर्ड पिंजून काढल्याने आजून तीन वेळा मतदारांपर्येंत शिवसेनेचे उमेदवार पोचणार असून आपण नगरपालिकेत गेल्यावर कर्जतच्या विकासासाठी काय करणार आहोत हे मतदाराने समजावून सांगत आहेत.

गेली पंधरा वर्ष राष्ट्रवादीने कर्जतचा अपुरा विकास ठेवला आहे तो आम्ही पूर्ण करू असे ठाम वचन कर्जतकर जनतेला शिवसेनेच्या वतीने देण्यात येत आहे. शहरातील रस्ते गल्ल्या ,शुद्ध पाणी,अखंडित वीजपुरवठा,खेळासाठी मैदाने, क्रीडासंकुल,चांगली उद्याने,घरपट्टी आणि पाणीपट्टीच्या प्रलंबित प्रश ,भूमिगत गटारे,भूमिगत वीजवाहिन्या ,अद्यावत आणि चांगली समशानभूमी याप्रश्नांवर भर देऊन आणि ते सोडवण्यासाठी कटिबद्ध राहणार असल्याचे वचन शिवसेनेच्या उमेदवांकडून मतदारां देण्यात येत आहे .शिवसैनिकांचा उत्साह आणि जोश या प्रचार फेरीमध्ये ओसंडून वाहत असून यावेळी परिवर्तन करायचेच हा निर्धार शिवसैनिकांनी केला आहे.