कर्नाटकात भाजप सरकार तरले, पोटनिवडणुकीत 12 जागा जिंकल्या

143
yediyurappa1

काँग्रेस-जेडीएस आघाडीत फूट पाडत काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांच्या नेतृत्वात भाजपने सत्ता स्थापन केली होती. अल्पमतातील या सरकारला बहुमतासाठी 6 जागांची गरज होती. विधानसभेच्या 15 जागांवर झालेल्या पोटनिलडणुकीत भाजपला 12 जागांवर यश मिळाल्याने फोडाफोडीचे राजकीय नाटय़ घडवून कर्नाटकमध्ये स्थापन केलेले सरकार टिकविण्यात अखेर भाजपला यश आले आहे.

काँग्रेस-जेडीएस आघाडी सरकारमधील काँग्रेसच्या 14 आणि जेडीएसच्या 3 आमदारांनी राजीनामा दिला होता. परिणामी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्या नेतृत्वातील सरकार कोसळले. सरकार विरोधात बंड पुकारत भाजपच्या तंबूत दाखल होणाऱया सर्व आमदारांना तत्कालीन विधानसभा अध्यक्षांनी अपात्र ठरवले होते. यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर 15 जागांवर पोटनिवडणूक घेण्यात आली, तर दोन जागांबाबत न्यायालयात अद्यापही खटला सुरू आहे.

कर्नाटकमध्ये विधानसभेच्या 15 जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपला 12 जागांवर विजय मिळाला आहे. काँग्रेसला आपल्या 12 जागांपैकी केवळ तीनच जागांवर विजय मिळवता आला. तर माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्या नेतृत्वात लढलेल्या जेडीएसला एकही जागा जिंकता आलेली नाही. या निकालामुळे अल्पमतातील भाजप सरकारकडे बहुमत आले आहे.

जनमताचा अपमान करणाऱया काँग्रेसला जनतेने धडा शिकवला – मोदी
कर्नाटक पोटनिकडणुकांमध्ये भाजपला मिळालेल्या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे. कर्नाटकमध्ये काँग्रेसने मागच्या दाराने जनादेश चोरला होता. जनमताचा अपमान करून मागच्या दाराने सरकार स्थापन करणाऱया काँग्रेसला कर्नाटकच्या जनतेने धडा शिकवला. काही लोक म्हणायचे की, दक्षिणेकडील राज्यात भाजपचा प्रभाव कमी आहे. मात्र त्या लोकांना कर्नाटक पोटनिवडणुकीच्या निकालाने लोकशाही पद्धतीने धडा शिकवला असल्याचे मोदी म्हणाले.

सिद्धरमय्या यांचा किरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा
कर्नाटक पोटनिकडणुकीत झालेल्या पराभकाची जबाबदारी स्कीकारून सिद्धरमय्या यांनी काँग्रेस किधिमंडळ पक्षनेतेपद आणि किरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. लोकांनी जो कौल दिलाय तो मला मान्य आहे. काँग्रेस पक्षाच्या भल्याचा किचार करुन मी किधिमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा देत असल्याचे सिद्धरमय्या यांनी म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या