कर्नाटकातील मंदिरांमध्ये होणाऱया आरतीचे नामकरण ‘संध्या आरती’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कर्नाटकमधील मंदिरांमध्ये होणाऱया  ‘सलाम आरती’चे आता ‘संध्या आरती’ असे नामकरण राज्य सरकारने केले आहे. हिंदुत्ववादी संघटनांच्या मागणीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.  टिपू सुलतानच्या काळापासून मंदिरांमध्ये होणाऱया आरत्यांना सलाम आरती म्हणून ओळखले जात होते. मात्र राज्यातील टिपू सुलतानच्या खाना-खुना पुसण्यासाठी हिंदू मंदिरांची देखभाल करणाऱया स्टेट अॅथॉरिटीने याला मंजुरी दिली आहे. टिपू सुलतानने 18 व्या शतकात मंदिरातील आपल्या भेटी दरम्यानच्या आरतीचे नामकरण सलाम आरती असे केले होते.