
कर्नाटक सरकारने राज्यातील आयटी कंपन्यांना आपल्या कर्मचाऱ्यांना डिसेंबर 2022पर्यंत घरातूनच काम करण्याची अर्थात वर्क फ्रॉम होम (Work From Home) करण्याची परवानगी देण्याचे आवाहन केले आहे. पण यामागे कोरोना हे कारण नाही, तर बंगळुरू मेट्रोच्या बांधकामामुळे आऊटर रिंग रोडवर मोठय़ा प्रमाणात होणारी संभाव्य वाहतूककोंडी टाळण्यासाठी सरकारकडून ही विनंती करण्यात आली आहे. कर्नाटक सरकारने मंगळवारी (24 ऑगस्ट) आयटी कंपन्यांनी (IT Companies) डिसेंबर 2022पर्यंत म्हणजेच आणखी वर्षभर आपल्या कर्मचाऱयांना घरातच काम करण्यास सांगावे , असे सुचवले आहे.
























































