
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आज लोकभवनात जाऊन त्यांचा राजीनामा सुपूर्द केला आहे. राज्यपाल थावरचंद गेहलोत हे सध्या राज्यात नसल्याने त्यांनी राज्याच्या सचिवांकडे आपला राजीनामा सोपवला आहे. सिद्धरामय्या यांची जागा सध्याचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार घेणार आहेत.
Bengaluru: “I have submitted my resignation to the Governor’s Office. The Governor is not here; he is returning tonight. So, I submitted the resignation to his office,” says Karnataka CM Siddaramaiah pic.twitter.com/K48kn6Vjww
— ANI (@ANI) May 28, 2026
दोन दिवसांपूर्वी काँग्रेस हायकमांडकडून मला राजीनामा द्या असे सांगण्यात आले. पक्ष श्रेष्ठींच्या आदेशानुसार मी आज राजीनामा दिला आहे. राज्यपाल हे सध्या राज्यात नसल्याने त्यांच्या सचिवांकडे माझा राजीनामा सुपूर्द केला आहे, असे सिद्धरामय्या यांनी सांगितले,
डि. के शिवकुमार यांच्या शपथविधीबाबत अद्याप अधिकृत घोषणा झाली नसली तरी 30 मे रोजी त्यांचा शपथविधी पार पडणार असल्याची चर्चा आहे.




























































