कर्नाटकचे आजी मुख्यमंत्री येडियुरप्पानंतर माजी मुख्यमंत्री सिद्धारामैय्या यांनाही कोरोनाची लागण

590

कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांना कोरोनाची लागण झाली असताना माजी मुख्यमंत्री सिद्धारामैय्या यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. सिद्धारामैय्या यांना सोमवारी रात्री मणिपाल रुग्णालयात दाखल केले आहे. सिद्धारामैय्या याअंना ताप आल्याने रुग्णालयात दाखल केले होते. त्यांची कोरोना टेस्ट केल्यानंतर ते पॉझिटिव्ह आढळले आहेत.

कोरोना सेंटरमध्ये डॉक्टरकडून महिला रुग्णाचे लैंगिक शोषण 

सिद्धारामैय्या यांना ताप आला होता. म्हणून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली तेव्हा पॉझिटिव्ह आली. सिद्धारामैय्या यांचे पुत्र यतींदरा यांनी ही माहिती दिली आहे. कर्नाटकात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत आहे. सामान्यच नव्हे तर अनेक बड्या लोकांना कोरोनाची लागण होत आहे.

कॅन्सरशी झुंजणाऱ्या 100 वर्षांच्या आजींची कोरोनाला धोबीपछाड!  

रविवारी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. त्यांना तत्काळ मणिपाल रुग्णालयात दाखल करण्यात आले. सोमवारी येडियुरप्पा यांची कन्या पद्मावती यांना कोरोनाची लाग्ण झाली आणि त्यांना मणिपाल रुग्णालयात दाखल करण्यात आले.

राज्यात 24 तासांत 10 हजार रुग्ण कोरोनामुक्त, 8 हजार 968 नवीन रुग्ण

मुख्यमंत्री येडियुरप्पा यांची तब्येत स्थिर असल्याची माहिती त्यांचे पुत्र विजेयंद्र येडियुरप्पा यांनी दिली आहे. येडियुरप्पा यांच्यावर उपचार सुरू असून त्यांच्या कुटुंबीयांना 7 दिवसांसाठी क्वारंटाईन करण्यात आले आहे.

कर्नाटकात गेल्या 24 तासात 4 हजार 752 रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे राज्यातील एकूण रुग्णांची संख्या 1 लाख 39 हजार 571 रुग्णांवर पोहोचली आहे. राज्यात सध्या 74 हजार 469 सक्रिय रुग्ण आहेत.

केंद्रीय गृहमंत्री यांनाही कोरोनाची लागण

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना तातडीने उपचारासाठी गुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शहा यांनी स्वतः ट्विट करत याबाबत माहिती दिली होती. राजधानी दिल्लीतील कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता अमित शहा यांनी स्वतः कमान सांभाळत तेथील परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी जातीने लक्ष घातले होते. या निमित्ताने सतत आयोजित बैठकांच्या निमित्ताने ते अनेकांच्या संपर्कात आले. याच दरम्यान कोरोनासदृश लक्षणे आढळून येत असल्याने त्यांनी चाचणी केली. या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

उत्तर प्रदेशच्या मंत्री कमल वरूण यांचा कोरोनामुळे मृत्यू

योगी आदित्यनाथ यांच्या सरकारमधील कॅबिनेट मंत्री कमल राणी वरुण यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर जलसंपदा मंत्री महेंद्र सिंह यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. उत्तर प्रदेश सरकारमध्ये तंत्रशिक्षण मंत्री असणार्‍या कमल राणी यांची 18 जुलै रोजी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आल्याने त्यांना एसजीपीजीआय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

आपली प्रतिक्रिया द्या