ओला टॅक्सीवर सहा महिन्यांसाठी बंदी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
ola-uber-protest

सामना ऑनलाईन । बंगळुरू

ओला व उबेर या खासगी टॅक्सी सर्व्हिसने दररोज हजारो प्रवासी प्रवास करत असतात. कर्नाटकमध्ये या ओला टॅक्सी सर्व्हिसवर सहा महिन्यांची बंदी घातली आहे. कर्नाटक सरकारने ओलाचा परवाना सहा महिन्यासाठी रद्द केला आहे. त्यामुळे सध्या कर्नाटकातील सर्व ओला टॅक्सी या उभ्या आहेत.

ओलाच्या कार व बाईक सर्व्हिसने अनेक नियमांचे उल्लंघन केले आहे. याबाबत त्यांना अनेकदा ताकिद देण्यात आली. मात्र तरिही ओलाकडून अनेकदा नियमांचे उल्लंघन झाले आहे. त्यामुळे कर्नाटकच्या परिवहन विभागाने ओलावर 18 मार्चपासून सहा महिन्यांची बंदी घातली आहे.