
कर्नाटक राज्यातील रायचूर जिल्ह्यात एक भयंकर घटना घडली आहे. एका विकृताने गायीच्या वासरावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केला आहे. या विकृताला अटक करण्यात आली आहे.
नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, या आरोपीचं नाव इम्तियाज हुसैन मियां असं असून तो 24 वर्षांचा आहे. पोलिसांनी केलेल्या चौकशीत त्याने आपला गुन्हा कबूल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गायीचा मालक वासराला चरण्यासाठी शेतात सोडून गेला होता. जिथे वासरू बांधलेलं होतं, तिथूनच जवळ एक मशीद आहे.
काही लोकांनी इम्तियाजला वासरावर अनैसर्गिक अत्याचार करताना पाहिलं आणि पोलिसांना फोन केला. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत त्याला पकडलं. त्याने पोलिसांसमोर गुन्हा कबूल केला असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील कारवाई करत आहेत.






















































