Karnataka election result – कर्नाटकात भाजपच्या 11 मंत्र्यांना पराभवाचा धक्का

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कर्नाटकात काँग्रेसने भाजपला जोरदार धक्का देत सत्तेवरून खाली केले आहे. गेल्या विधानसभा निवडणूकीच्या तुलनेत भाजपच्या तब्बल 39 जागा कमी आल्या आहेत तर काँग्रेसच्या तब्बल 56 जागा वाढल्या आहेत. भाजपने कर्नाटकात जोरदार प्रचार केला तरी देखील तेथील त्यांच्या तब्बल 11 मंत्र्यांना आपली आमदारकी टिकवता आलेली नाही.

कर्नाटक मंत्रीमंडळातील 11 मंत्र्यांचा विजय झाला आहे तर 11 मंत्र्यांचा पराभव झाला. सुदैवाने कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचा शिगाव मतदारसंघातून विजय झाला. त्यांना तब्बल 35 हजार मतांनी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव केला.

हरलेले मंत्री – व्ही. सोमन्ना, बीएस श्रीमालू, मधुस्वामी, गोविंदा करजोल, के सुधाकर, एमटीबी नागराज, बीसी पाटील, मुरुगेश निराणी, केसी नारायगौडा, बीसी नागेश, शंकर पाटील