कश्मीरी खेळाडूचा झुंजार खेळ, हिंदुस्थानने पाकिस्तानला 8 विकेट्सने नमवले

1037

हिंदुस्थानने जम्मू-कश्मीरमधून कलम 370 रद्द केल्यानंतर पाकिस्तानचा तळमळाट सुरू आहे. एकीकडे पाकिस्तान हिंदुस्थानविरोधात राजकीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर रणनिती आखत आहे. अशातच टीम इंडियाने दिव्यांगांच्या टी-20 विश्व चॅम्पियनशिपमध्ये पाकिस्तानवर एकतर्फी सामन्यात 8 विकेट्सने विजय मिळवला. या विजयासह टीम इंडियाने फायनलमध्ये प्रवेश केला आहे. टीम इंडियाच्या विजयामध्ये महत्त्वाची भूमिका निभावली ती कश्मीरी खेळाडूने.

इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या पहिल्या दिव्यांग टी-20 विश्व चॅम्पियनशिप सुरू आहे. सेमी फायनलमध्ये पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 विकेट्स गमावून 150 धावा केल्या. टीम इंडियाकडून व्ही.आर. केनीने 15 धावा देत 2 विकेट घेतले. पाकिस्तानने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना कश्मीरी खेळाडू वसिम इक्बाल याने 43 चेंडूत 69 धावांची अर्धशतकी खेळी केली आणि टीम इंडियाला विजय मिळवून दिली. या झुंजार खेळीबद्दल त्याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.

151 धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाचा 25 वर्षीय सलामीवीर खेळाडू वसिम इक्बाल याने 43 चेंडूत 6 षटकार आणि 4 चौकारासह 69 धावांची खेळी केली. यासह कुणाल फणसे याने 47 चेंडूत 55 धावा केला. टीम इंडियाने पाकिस्तानने दिलेले लक्ष्य अवघ्या 17.1 षटकात गाठले.

इक्बाल अनंतनागचा रहिवासी
वसिम इक्बाल हा अनंतनाग येथील रहिवासी आहे. सामनावीर पुरस्कार मिळाल्यानंतर इक्बाल म्हणाला की, ईदच्या दिवशी हा विजय मिळाल्याने मला आनंद होत आहे. माझ्या आयुष्यातील हा खास दिवस आहे.

आपली प्रतिक्रिया द्या