खाकीतील माणुसकी, रस्त्यावरील विक्रेत्या मुलांकडून एसएसपींनी खरेदी केली सर्व खेळणी

कोरोना काळात पोलिसांनी रस्त्यावरील पादचाऱयांना तुफानी मारहाण केल्याच्या बातम्या आपण मोठय़ा संख्येने ऐकतो. पण या काळात खाकी वर्दीतील माणुसकीच्या ओलाव्याच्या कथाही आपल्याला दिसून येत आहेत. जम्मू-कश्मीरातील श्रीनगरच्या बादशहा चौकात वरिष्ठ पोलीस अधीक्षक संदीप चौधरी संचारबंदीच्या काळात रस्त्याच्या कडेला खेळणी विकायला बसलेल्या गरीब मुलाकडील सर्व खेळणी खरेदी करत माणुसकीचे दर्शन घडवले.

संदीप चौधरी यांनी 6,500 रुपये किमतीची खेळणी विकत घेत त्या मुलाला घरी पाठवले. ‘बाळ, कोरोनाच्या महामारीत स्वतःला जप, फार वेळ रस्त्यावर फिरू नकोस,’ असा प्रेमाचा सल्लाही त्यांनी त्या छोटय़ा खेळणी विव्रेत्याला दिला. आपल्या साहेबांच्या या दयाशीलतेने त्यांच्या हाताखाली काम करणारे पोलीस कर्मचारीही भारावून गेले. कश्मिरी नागरिकांना खाकी वर्दीतील या माणुसकीचे मुक्तपंठाने काैतुक केले.

आपली प्रतिक्रिया द्या